Skip to main content

हौशी शरीर सौष्ठव संघटना बृहन्मुंबई (रजी) यांच्या मान्यतेने राज्यभरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या “पसायदान” संस्थेने शहीद भगतसिंग मैदान, काळाचौकी, मुंबई येथे तरुण मुलांमध्ये शारीरिक स्वास्थ्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने दिनांक ०६ एप्रिल रोजी “पसायदान श्री २०२५” खुली राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन केले. सदर स्पर्धेसाठी १५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.
विभागीय आमदार श्री. अजय चौधरी यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरूवात केली असे जाहीर केले. खासदार श्री अनिल देसाई, माजी आमदार बाळा नांदगावकर, माजी शेरीफ डॉ. जगन्नाथराव हेगडे तसेच समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थितीत राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला.
या स्पर्धेत विजय भोईर (अमरावती) यांनी “पसायदान श्री २०२५” चा प्रथम मानकरी ठरत रोख रक्कम रुपये २१,०००.०० व आकर्षक ट्रॉफीवर आपले नाव कोरले. बेस्ट pojar म्हणून अनुक्रमे १) विवेक सुधाकर वडके (मुंबई) रोख रक्कम रुपये २,००० व ट्रॉफी २) विनायक सुरेश घडसे (मुंबई) रोख रक्कम रुपये १,५०० व ट्रॉफी तसेच चार गटांमधून प्रत्येक गटात सात स्पर्धकाना रोख रक्कम, ट्रॉफी अशी पारितोषिके देण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी होण्याकरता ‘पसायदान’ संस्थेच्या अध्यक्षा सौ रुपाली काणकोणकर व त्यांचे सहकारी तसेच हौशी शरीर सौष्ठव संघटना बृहन्मुंबई (रजी) चे अध्यक्ष श्री प्रवीण खामकर व त्यांचे सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply